Sameer Wankhede on Jawan's Dialouge : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान‘ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. काल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असलेल्या शाहरुखच्या डायलॉगनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. तो डायलॉग म्हणजे 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर'. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखच्या या डायलॉगनं फक्त प्रेक्षकांचे लक्ष वेधले नाही तर त्यासोबतच तो डायलॉग हा समीर वानखेडे यांच्यासाठी असल्याचं म्हटलं आहे. त्यावर एकीकडे शाहरुखनं प्रतिक्रिया दिली आणि हा डायलॉग कोणासाठी हे सांगितलं. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांनी सोशल मीडियावर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीर वानखेडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये समीर वानखेडे यांनी आपल्याला कसलेही भय वाटत नाही असा अर्थ या वाक्यातून अभिप्रेत आहे. अमेरिकी लेखिका निकोल लायन्सचं वाक्य समीर वानखेडेंनी शेअर केलं आहे. या वाक्याचं ढोबळपणे भाषांतर केल्यास, "मी जे जे पूल जाळले आहेत त्यांच्या आगीची दाहकता अनुभवली आहे. त्याच्या राखेत मी नाचलोही आहे. मला कोणाचीही भीती वाटत नाही. तुझीही नाही," असा होतो. समीर वानखेडे यांनी शेअर केलेली ही क्रिप्टीक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांनाच ट्रोल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी खरंच हे कोट खूप सुंदर आहे. 



2021 मध्ये समीर वानखेडे हे मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक होते. त्यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका क्रूझवर छापा टाकला होता. या क्रुझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यावेळी तिथे शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान देखील होता. याप्रकरणी आर्यन खान हा जवळपास महिनाभर तुरुंगात होता. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप झाला. आर्यन खानच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी आर्यनच्या कुटुंबियांकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितली, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.


हेही वाचा : दोन्ही मुलं घर सोडून जात असताना, माधुरीनं शेअर केली भावूक पोस्ट!


शाहरुखचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर असून चित्रपटाची आगाऊ बुकिंग करण्यात चाहत्यांमध्ये घोडदौड सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही.