रश्मिकाच्या `सामी सामी`ला टक्कर द्यायला आली, नवी परम सुंदरी; Video Viral
लोकप्रियतेचा आकडा सांगणंही कठीण. याच चित्रपटातील सर्वांना वेड लावणारं एक गाणं म्हणजे `सामी सामी`.
मुंबई : सध्या बॉलिवूडपेक्षाही जास्तच चर्चा होतेय ती म्हणजे दाक्षिणात्य कला जगताची. दक्षिणेकडील कलाकारांच्या अभिनेत्यांची साऱ्या जगात चर्चा आहे. या लोकप्रियतेची प्रचिती आली ती म्हणजे 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटातून.
अल्लू अर्जुनची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटातील डायलॉग्सपासून ते अगदी त्यातील गाण्यांपर्यंत सर्वगाही गाजलं.
इतकं तुफान गाजलं की लोकप्रियतेचा आकडा सांगणंही कठीण. याच चित्रपटातील सर्वांना वेड लावणारं एक गाणं म्हणजे 'सामी सामी'.
असं वाटलं की हेच गाणं यंदाचं वर्ष गाजवणार. पण, तितक्यातच आता एका नव्या गाण्याची एंट्री झाली आहे. ज्याची चर्चा हळुहळू जोर धरताना दिसत आहे.
हे गाणं आहे, अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार (Thalapathy Vijay) विजय याच्या आगामी चित्रपटातील गाण्याची.
'बीस्ट' या नव्या चित्रपटातील 'अरेबिक कुथू' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पूजा हेगडे आणि विजय यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.
गाण्याला असणारा अरेबियन टच त्याचं वेगळेपण सिद्ध करून जात आहे. आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, की रश्मिकाच्या अदांसमोर या अरेबिक कुथू आणि अभिनेत्री पूजा हेगडे हिच्या अदा भारी पडणार का?