मुंबई : अभिनेता शाहरूख खान स्टारर 'कुछ कुछ होता है' चित्रपटात शाहरूखचया मुलीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सना सईदच्या वडिलांचं निधन २२ मार्च रोजी झालं होतं. तेव्हा कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण भारतात लॉकडाऊन केल्यामुळे तिला तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता आले नाही. तिच्या वडिलांचे नाव अब्दुल अहद सईद आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्दुल अहद सईद हे उर्दू कवी आहेत. त्यांचा मृत्यू २२ मार्च रोजी झाला. त्यावेळे सना लॉस एंजलिसमध्ये एका कार्यक्रमासाठी गेली होती. लॉकडाऊनमुळे ती त्याठिकाणी अडकली होती. आमची सहयोगी वेबसाईट बॉलीवुडलाईफ.कॉम यासंदर्भातील वृत्त प्रसारित केलेल आहे. 



एका मुलाखती दरम्यान तिने आपले वडील मधुमेहग्रस्त असल्याचे सांगितले होते. ज्यामुळे त्यांचे सर्व ऑर्गन निकामी झाले होते. तेव्हा लॉकडाऊनमुळे ती घरी वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकली नाही. जेव्हा लॉस एंजलिसमध्ये तिला आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा तिला फार मोठा धक्का बसल्याचं तिने सांगिलते. 


सध्या कोरोनामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत तर संपूर्ण जगात लाखोंना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सगळ्याच देशांसाठी हा धोकादायक विषाणू गंभीर विषय झाला आहे.