मुंबई : 'डोंबिवली फास्ट' या सिनेमातून अभिनेता संदीप कुलकर्णी याने सामान्य माणसाची व्यथा मांडली होती. आजही त्याने साकारलेला माधव आपटे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. हा माधव आपटे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डोंबिवली रिटर्न' या सिनेमाच्या माध्यमातून सायकोथ्रीलर बाजातील या सिनेमाचा सिक्वेल भेटीला येत आहे. संदीप कुलकर्णीने याचा पोस्टर शेअर केला आहे. 


फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर 'डोंबिवली रिटर्न'मधून संदीप कुलकर्णी आपल्याला निर्मात्याच्या भूमिकेत देखील दिसणार आहे. 2019 साली हा सिनेमा भेटीला येणार आहे. 



 करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘डोंबिवली रिटर्न’ चित्रपटाची निर्मिती होणार आहे. संदीप कुलकर्णी सोबत या सिनेमामध्ये अभिनेत्री राजश्री सचदेव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. महेंद्र तेरेदेसाई  या सिनेमाचं दिगदर्शन करणार आहे.


‘डोंबिवली रिटर्न ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. या चित्रपटातून सायकोलॉजिकल थ्रिलर पाहायला मिळणार असंही संदीप म्हणाला


. या चित्रपटाचं पोस्टर संदीपनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे. या सिनेमाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 


संदीप कुलकर्णी यापूर्वी श्वास, डोंबिवली फास्ट, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘अजिंक्य’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आला होता. त्यापूर्वी 'अवंतिका' या मालिकेतील संदीपची भूमिका विशेष लक्षात राहणारी आहे.