Writer Sanjay Chouhan Death News: बॉलिवूड चित्रपट 'पान सिंग तोमर' (Paan Singh Tomar)  या चित्रपाटचे लेखक संजय चौहान (Sanjay Chouhan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 62 व्या वर्षी संजय यांना अखेरचा श्वास घेतला. संजय हे यकृताचे आजारानं त्रस्त असल्याचे म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, 12 जानेवारी रोजी मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय चौहान यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसली आहे. 


Sanjay Chouhan यांनी पत्रकार म्हणून केली करिअरची सुरुवात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय चौहान हे मध्य प्रदेशातील भोपाळचे रहिवासी होते. संजय यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेत पत्रकार म्हणून करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्लीत पत्रकारिता केली. यासगळ्यात त्यांना 1990 मध्ये 'भंवर' ही क्राइम सीरिज लिहिण्याची संधी मिळाली. मग संजय हे मुंबईत आले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. मग ते अनेक मालिका आणि चित्रपटसाठी लेखक म्हणून काम करू लागले. दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या हजार ख्वाहिशें या चित्रपटासाठी त्यांना डायलॉग्स लिहिण्याची संधी मिळाली. (Sanjay Chouhan Started Career As Journalist)


हेही वाचा : बच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!


अभिनेता इरफान खानच्या (Irfan Khan) 'पान सिंग तोमर' (Paan Singh Tomar Writer Sanjay Chouhan Death) या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली कथा ही चांगलीच गाजली होती. याशिवाय त्यांनी (I am Kalam) आणि तिग्मांशु धूलिया यांच्यासोबत 'साहेब बीवी और गँगस्टर' (Saheb, Biwi Aur Gangster) सारख्या चित्रपटासाठी सहलेखन केले. संजयला 2011 मध्ये आलेल्या 'आय एम कलाम' या चित्रपटासाठी तर त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय ‘मैंने गांधी को नहीं मारा’ (Maine Gandhi Ko Nahin Mara) आणि ‘धूप’ (Dhoop) हे त्यांचे नावाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहेत.