COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अभिनेता संजय दत्तवर आधारीत बायोपिक सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झाला आहे. या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. या सिनेमाचे फिल्ममेकर आहेत राजकुमार हिरानी. या सिनेमाचं नाव हे संजू असंच ठेवण्यात आलं आहे.  या टीझरची सुरूवात संजय दत्त बनलेल्या रणबीर कपूरने कारागृहातून केली आहे. या सिनेमांत संजय दत्तचा आतापर्यंतचा प्रवास साकारला आहे. मात्र राजू हिरानी याने आपल्या अंदाजात हा सिनेमा तयार केला आहे. संजय दत्तचे वेगवेगळे रूप या टीझरमध्ये दाखवले आहे. 


या सिनेमामुळे संजय दत्त आणि रणबीर कपूरचे फॅन्स एक्साइटेड आहेत. रणबीर कपूरने तरूण संजय दत्त आणि मधल्या काळातला संजय दत्त अगदी उत्कृष्ठपणे साकारला आहे. हा सिनेमा 29 जून रोजी रिलीज होत आहे. विदू विनोद चोपडा आणि राजकुमार हिरानी यांच्या प्रोडक्शन बॅनर खाली हा सिनेमा तयार होत आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी राजकुमार हिरानी यांच्याकडे आहे. हा टीझर एकाचवेळी 80 हून अधिक चॅनल्सवर रिलीज करण्यात आला.


हा टीझर 80 सेकंदाचा असून हा स्टार नेटवर्कवर प्रसारित केला आहे. हा टीझर आयपीएलच्या दरम्यान दाखवण्यात येणार आहे.