मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त तिच्या वडिलांपेक्षा कमी प्रसिद्ध नाही. त्रिशला सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असते. अलीकडेच त्रिशलाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत लाइव्ह सेशन केलं. चाहत्यांशी झालेल्या संभाषणादरम्यान, जेव्हा लोक तिला जज करतात तेव्हा त्रिशाला कसं वागते हे तिने यावेळी सांगितलं. त्रिशालाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर थेट साधलेल्या संवादा दरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं की, 'जे लोक सतत तुम्हाला जज करतात त्यांच्याशी तुम्ही कसे वागतात? या प्रश्नाला उत्तर देताना त्रिशाला म्हणाली, 'मी माझा पहिला श्वास घेतल्यापासून लोक मला जज करत आली आहेत. दुर्दैवाने हे माझ्या कुटुंबासोबत आमच्या नावासोबत घडत आलं आहे.


 जेव्हा आपण जजमेंटल लोकांशी डिल करतो तेव्हा त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. हे लोक आसपासच्या जगालाही जज करण्यास सुरवात करतात. जेव्हा आपणच स्वतःवर चिडचिड करतो नरवस असतो. तेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या जगास वाईट मानू लागतो. जेव्हा आपण खूश असतो तेव्हा कोणीही असं वागत नाही. 


त्रिशला दत्ता पुढे म्हणाल्या, 'प्रत्येकाशी आदर, प्रेम आणि दयाळूपणे वागलं पाहिजे. जे तुम्हाला जज करतात त्यांच्यासोबतही. तो पात्र नाही म्हणून नाही तर, आपण  पात्र आहोत म्हणून चांगलं वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट शांततेत घालवा. यामुळे तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. जे तुम्हाला जज करतात त्यांना स्वत: ला सुधारू द्या.



काही दिवसांपूर्वी त्रिशला दत्तने तिच्या वडिलांच्या व्यसनाबद्दल चर्चा केली होती. त्रिशलाने एका इंस्टाग्राम चॅट दरम्यान संजय दत्तच्या व्यसनतेवर भाष्य केलं. त्रिशला दत्तला इन्स्टाग्रामवर एका युझर्सने विचारलं होतं की, वडिलांच्या व्यसनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. यावर त्रिशाला म्हणाली, त्रिशलाने तिच्या वडिलांच्या ड्रग्स एडिक्शनबद्दल लिहिलेली ही चिठ्ठी तिच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केली आहे. वडिलांच्या ड्रग्स एडिक्शनबद्दल बोलताना त्रिशाला त्यांच्याबद्दल अभिमान बाळगण्याविषयी बोलली होती.