`संजू`चा खरा मित्र `कमली`ने लिहिली भावनात्मक पोस्ट
संजूचा खरा मित्र सिनेमा पाहून काय बोलला
मुंबई : संजय दत्तचा बायोपिक सिनेमा संजूने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. ऐवढच नाही तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड संजूने केला आहे. सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणारा अभिनेता संजय दत्तचा जवळचा मित्र परेश गिलानीने शनिवारी एक भावनात्मक नोट लिहिली. त्याने म्हटलं की, तो खूप भावनिक झाला. सिनेमाने काही अविस्मरणीय आठवणींनी पुन्हा उजाळा दिला. ज्यामुळे खूप बरं वाटलं.'
'संजू' सिनेमात दाखवण्यात आलेल्या विक्की कौशलने कमलेश कपासी उर्फ कमलीची भूमिका केली आहे. गिलानीने ट्विट केलं आहे की, "अनेक वर्षांपासून सोशल मीडियापासून लांब आहे. पण आता शेवटी मी त्याचा स्विकार करतोय. सुरुवात करतात भाऊ संजय दत्तसाठी एक नोट, जे मी अनेक दिवसांपासून मनात आणि डोक्यात लिहित होतो आणि हे सगळ्यांच्या समोर आहे.'
एक मोठ्या पोस्टमध्ये गिलानीने राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजय दत्तच्या आयुष्यावर आणि 'रॉकी'च्या स्टारसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि भावना त्याने व्यक्त केल्या. गिलानीने म्हटलं की, "फिल्म 'संजू' पाहिल्यानंतर मी भावनिक झालो. मी फक्त संजलची गळाभेट घेऊन रडू इच्छितो. मी त्या वर्षांसाठी रडू इच्छितो जे आम्ही गमवले. जिवनात चढ-उतार असताना एकमेकांच्या सोबत उभे राहिलो. पण जेव्हा आपल्या लोकांना गमवलं ही चूक आम्ही नाही सुधारु शकत. मी रडू इच्छितो त्या शक्तीसाठी जी आम्हाला एकमेकांकडून मिळाली.'