.. म्हणून संजय दत्तने `द गुड महाराजा`ला दिला नकार
अभिनेता संजय दत्त `भूमि` या चित्रपटातून पुन्हा हिंदी सिनेसृष्टीत आला.
मुंबई : अभिनेता संजय दत्त 'भूमि' या चित्रपटातून पुन्हा हिंदी सिनेसृष्टीत आला.
या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर लगेजच ओमंग कुमार सोबत 'द गुड महाराजा' हा चित्रपट करत असल्याची माहिती दिली होती. मात्र आता संजय दत्त या चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे वृत्त आले आहे.
'भूमि' चित्रपटाकडून संजय दत्तला खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फारशी कमाल न करू शकल्याने संजय दत्तने 'द गुड महाराजा' देखील नाकारला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील ओमंग यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा या दिग्दर्शकासोबत काम न करण्याची इच्छा असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
'द गुड महाराजा' हा चित्रपट नवानगरमधील राजावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये ब्रिटीश कालखंडातील काळ दाखवला जाणार आहे.
ओमंगसोबत काम न करण्याची इच्छा तसेच हा चित्रपट काही वादांमध्ये अडकल्याने संजय दत्तने काढता पाय घेतला घेतल्याचीही चर्चा आहे. नवानगर येथील राजाचे वंशज आणि सिने निर्माते यांच्यामध्ये वाद रंगला अअहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडून लीगल नोटीसही पाठवण्यात आली होती.
सध्या संजय दत्त 'साहिब बीवी और गैंगस्टर 3' च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर 'तोबाज' चित्रपटामध्ये संजय दत्त आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहे.