नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पून्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील न्यायालयाने अभिनेता संजय दत्त याच्याविरोधात समन्स जारी केलं आहे. या समन्सनुसार संजय दत्त याला १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?...


२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अभिनेता संजय दत्त याने बसपा अध्यक्षा मायावती यांच्यावर टिप्पणी केली होती. यामुळे संजय दत्त याच्याविरोधात समन्स जारी करण्यात आलं आहे.


अभिनेता संजय दत्त याने १९ एप्रिल २००९ साली टिळकनगर क्षेत्रात समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. संजय दत्तने म्हटलं होतं की, "मी मायावतीला जादूची झप्पी देईल".


जिल्हा प्रशासनाने या सभेचं व्हिडिओ शूटिंगही केलं होतं. त्यानंतर संजय दत्तच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


न्यायालयाने जारी केलेल्या समन्सनुसार, अभिनेता संजय दत्त याला येत्या १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित रहावं लागणार आहे. त्यामुळे संजय दत्त पून्हा एकदा अडचणीत सापडला असे दिसत आहे.