संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये सात फेरे घेताना दिसत आहे. यामुळे संजय दत्तने तिसऱ्यांदा लग्न केलं का? अशी चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ संजय दत्तच्या घरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. घरात रेनोवेशनचं काम झालं असून त्यानिमित्ताने पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पूजे दरम्यान संजय दत्त आणि मान्यता यांनी सात फेरे घेतले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे सात फेरे या पूजेची एक विधी असल्याच सांगण्यात येत आहे. यावेळी संजय दत्तने भगव्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता तर उपरणं देखील अंगावर होतं. तर मान्यताने साधा कुर्ता घातला होता. 


तिसऱ्यांदा केलं लग्न 



आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये संजय दत्तने 135हून अधिक सिनेमे केले आहेत. 65 वर्षांच्या संजय दत्तने तीन लग्न केली आहे. पहिली पत्नी ऋचा शर्मासोबत 1987 ला लग्न केलं तर, 1996 मध्ये ब्रेन ट्यूमरमुळे दुसऱ्या पत्नीचा मृत्यू झाला. मान्यतासोबत 2008 साली लग्न केलं. 


रिया पिल्लईसोबत दुसरे लग्न


संजयचे दुसरे लग्न 1998 मध्ये एअर होस्टेस आणि मॉडेल रिया पिल्लईसोबत झाले होते. हे नातेही 2008 मध्ये संपुष्टात आले.


मान्यता आणि दोन मुलांसह लग्न


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Maanayata Dutt (@maanayata)


त्यानंतर संजयने 2008 मध्ये गोव्यात दिलनवाज शेख उर्फ ​​मान्यता दत्तसोबत लग्न केले. याआधी दोघेही दोन वर्षे डेट करत होते. लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघेही जुळ्या मुलांचे पालक झाले.


1993 च्या ब्लास्ट


1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचे नाव पुढे आले होते, परंतु बॉम्बस्फोटांशी संबंधित आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. पण 2007 मध्ये बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला सुमारे 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.