मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या सिनेमांत काम करणाऱ्या कलाकारांचा आणि त्यांच्या भूमिकांचा एव्हाना खुलासा झालाय. या सिनेमात माधुरी दीक्षितची भूमिका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९१ मध्ये आलेल्या 'साजन' हा सिनेमा माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरला होता. या सिनेमानंतर या दोघांच्या अफअरच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. इतकंच नाही तर या दोघांनी गुपचूपरित्या लग्न केल्याच्याही बातम्या आल्या होत्या. विशेष म्हणजे, या दोघांनी या चर्चांवर कधीही भाष्य केलं नाही. परंतु, या 'चर्चित' विवाहाची बातमी संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मापर्यंत पोहचली होती. 


या दरम्यान ऋचा न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होती. तिच्यासोबत छोटी त्रिशालाही होती. संजय दत्त आणि ऋचा यांचा विवाह १९८७ मध्ये झाला होता. संजय-माधुरीच्या विवाहाच्या बातम्या कानावर पडल्यावर कॅन्सरवरचे उपचार सोडून ऋचा त्रिशालासह भारतात परतली होती. पण, संजय मात्र ऋचा घेण्यासाठी एअरपोर्टपर्यंतही गेला नाही. 


Caption

ऋचाच्या म्हणण्यानुसार, संजय आणि तिच्या नात्यानं अनेक चढ-उतार पाहिले होते... त्यांच्यात दुरावाही आला होता... परंतु, हे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाईल असा विचारही तिच्या मनाला शिवला नव्हता. पण संजय-माधुरीच्या विवाहाबद्दल जेव्हा तिनं बातम्या ऐकल्या तेव्हा तिनं संजयला विचारलं की तो घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे का? तेव्हा संजयनं स्पष्ट शब्दांत 'नाही' असं म्हटलं होतं. 


दुसरीकडे, माधुरीचे वडिलही संजय-माधुरीच्या नात्यावर खुश नव्हते. कारण, संजय विवाहीत होता आणि त्याला एक मुलगीही होती. १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजयचं नाव आल्यानंतर माधुरीनं संजयशी असलेलं नात तोडलं होतं. १९९६ मध्ये ऋचा हिचं ब्रेन ट्युमरनं निधन झालं.