मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज अदाकारांपैकी एक असलेल्या नरगिस यांचा आज जन्मदिवस. कलाविश्वात आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचा 1 जून 1929 रोजी जन्म झाला. वयाच्या जवळपास 51व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आईच्या वाढदिवशी त्यांचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्तने इन्स्टाग्रामवर ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर करत आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोमध्ये नरगिस संजय दत्त आणि प्रिया दत्त या आपल्या मुलांशी खेळताना दिसत आहेत. लहानपणीच्या या आठवणींसह संजयने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर त्याने भावनिक कॅप्शनही दिलं आहे.



संजय दत्तने शेअर केलेल्या या फोटोवर चाहतेही नरगिस यांना वाढदिवशी शुभेच्छा देत आहेत. संजय दत्त त्याच्या आईशी खूप जवळ होता. कर्करोगावर इलाजादरम्यान नरगिस संजयसाठी मेसेज रेकॉर्ड करुन पाठवायच्या. संजयने एका मुलाखतीत नरगिस यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा मेसेज ऐकून त्यांना रडू कोसळलं असल्याचंही संजयने सांगितलं होतं.