मुंबई : ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. पर्सनल आयुष्याप्रमाणे ही अभिनेत्री प्रोफेशनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. एकीकडे तिने तिच्या कारकिर्दीत यशाचे अनेक टप्पे गाठले, तर दुसरीकडे तिचं वैयक्तिक आयुष्यही तितक्याच अडचणींनी भरलेलं होतं.   2003 मध्ये करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केलं. पण तिचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. हा तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट टप्पा होता. लग्नानंतर 13 वर्षानंतर 2016 मध्ये तिने संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला. दरम्यान, तिच्यासोबत अनेक भयानक घटना घडल्या, त्यापैकी काहींबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीचं नाव अभिषेक बच्चनसोबत जोडलं जात होतं. मात्र काही कारणांमुळे तिचे हे लग्न तुटलं. अभिषेकसोबत नात तुटल्यानंतर तिने संजय कपूर यांच्याशी लग्न केलं. करिश्मासोबत लग्न केल्यानंतरही संजय कपूर यांचं त्यांत्या माजी पत्नीसोबत संबंध होते अशा चर्चा होत्या. लग्नानंतर दोघांमधील भांडणाच्या बातम्या अनेकदा चर्चेत राहिल्या होत्या.


लग्नानंतर या दोघांमध्ये इतके वाद होवू  लागले होते की, या दोघांचं एकमेकांसोबत एकत्र राहणंदेखील कठिण झालं होतं. यानंतर १३ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. करिश्मा कपूरने संजय कपूर याच्या आई राणी कपूरवर देखील गंभीर आरोप केले होते. २०१६मध्ये दोघांनी वेगळा व्हायचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना करिश्मा कपूरने सांगितलं होतं की, एकदा तिच्या आईने तिला तिच्या गरोदरपणात एक ड्रेस गिफ्ट केला होता, जो तिला फारसा चांगला वाटत नव्हता. यामुळे संतापलेल्या संजय कपूरने आईला विचारले की तू तिला मारत का नाहीस. करिश्मा कपूरला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला होता.


करिश्माने असाही खुलासा केला होता की, संजय कपूरचे अनेक महिलांसोबत फिजीकल रिलेशन होते. यामध्ये त्याला त्याची आईदेखील सपोर्ट करायची.  एवढंच नव्हेतर हनिमूनला संजय यांनी त्यांच्या मित्रांसोबत बेड शेअर करायला लावयचा प्रयत्न केला होता. २०१६मध्ये घटस्फोट झाल्यानंतर संजय आणि करिश्मा त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले. संजय कपूरने प्रिया सचदेवसोबत तिसरं लग्न केलं, तर करिश्मा कपूर तिच्या दोन मुलांसह समायरा आणि कियानसोबत राहते.