मुंबई : अभिनेता रणवीर सिंग, शाहीद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांचा आगामी ‘पद्मावती’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. तसा हा सिनेमा शूटिंग सुरू झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा हा सिनेमा सीन्स कट करण्यावरून चर्चेत आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमा काही दिवसातच रिलीज होणार आहे आणि अशात आता दिग्दर्शक संजय लीला भन्साली हे सिनेमातील काही सीन्स कट करणार आहेत. 


या बहुचर्चीत ऎतिहासिक सिनेमात दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. तर शाहीद राजा रतन सिंहची भूमिका साकारत आहे. आणि रणवीर सिंह यात अलाऊद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे. बॉलिवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या सिनेमाची लांबी खूप जास्त होत आहे. त्यामुळे संजय लीला भन्साळी यातील काही सीन्स कापणार आहेत. सिनेमाच्या फायनल कटनंतर या सिनेमाची लांबी २१० मिनिटे इतकी झाली आहे. आता संजय लीला भन्साली यांनी काही सीन्स कट करण्याचा निर्णय घेतलाय. 
 
दिग्दर्शक संजल लीला भन्साली आणि त्यांच्या टीमसाठी हे काम सोपं नाहीये. कारण सिनेमातील तिनही मोठ्या कलाकारांनी आपल्या भूमिकांसाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या भूमिकांना कमी वेटेज दिल्यास राग येऊ शकतो. हा सिनेमा येत्या १ डिसेंबरला रिलीज होणार आहे.