राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय वर्मा यांचं निधन
Sanjay Varma Death : संजय वर्मा यांना 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आणि त्याचा दुसऱ्याच दिवशी संजय वर्मा यांचे निधन झाले आहे.
Sanjay Varma Death : गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीतून एकामागे एक मोठे धक्के आपल्याला मिळत आहेत. नुकतंच सीमा देव यांचं निधन झालं तर आता लोकप्रिय एडिटर संजय वर्मा यांचे निधन झाले आहे. संजय वर्मा यांनी अनेक सुपरडिट चित्रपटांचं एडिंटिंग केलं होतं. मोठ्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं आहे. परवाच्या दिवशीच 'द लास्ट शो' या चित्रपटाच्या एडिटिंगसाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला. काल 25 ऑगस्ट रोजी संजय वर्मा यांचे निधन झाले.
संजय वर्मा यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. संजय वर्मा इंडस्ट्रीमधील अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. तर त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांचं एडिटिंग केलं आहे. संजय वर्मा हे एक उत्तम साऊंड डिझायनर होते. त्यांच्या उत्तम कामाला पाहता राकेश रोशन सारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केल आहे. राकेश रोशन यांच्या 'कोई मिल गया' या चित्रपटासाठी त्यांना फिल्म फेयरचा पुरस्कार देखील मिळाला होता. इतकंच नाही तर त्यांना आता 'द लास्ट शो' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला होता.
संजय वर्मा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांसाठी काम केले. ज्यात 1995 मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खान आणि सलमान खानचा 'करण अर्जुन' हा चित्रपट आहे. त्यानंतर 1997 साली प्रदर्शित झालेल्या 'कौन सच्चा कौन झूठा' या चित्रपटासाठी, तर 2000 च्या 'मिशन कश्मीर' आणि 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटासोबत आणखी अनेक चित्रपटाच्या एडिटिंगसाठी काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 52 चित्रपटांसाठी एडिटिंग केली आहे.
संजय वर्मा यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना 1996 मध्ये फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2000 मध्ये स्क्रीन अवॉर्ड मिळाला आणि 2001 मध्ये IIFA चा पुरस्कार मिळाला. संजयनं 2017 साली प्रदर्शित झालेल्या 'कौन मेरा कौन तेरा' आणि 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजेश ए बब्बर यांच्या 'छोरियां छोरों से कम नहीं होती' या चित्रपटांचे देखील एडिटिंग केले आहे.