मुंबई : सध्या सोशल मीडियावर डब्बू अंकलचा जलवा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोविंदा स्टाईलने डान्स केल्याने लोकप्रिय झालेले डब्बू अंकल सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी सोनी टी.व्ही. वरील दस का दम मध्येही त्यांनी उपस्थिती लावली होती. आता त्यांना जाहिरातीच्या ही ऑफर्स येत आहेत. पण सुपरस्टार गोविंदाला भेटणे हे डब्बू अंकलचे सर्वात मोठे स्वप्न होते. लोकप्रिय होण्यासाठी वर्षानुवर्षे महेत करावी लागते. पण डब्बू अंकल ऊर्फ संजीव श्रीवास्तव यांच्या भाळी रातोरात प्रसिद्ध होण्याचे लिहिले असावे. एका डान्स व्हिडिओमुळे रातोरात ते लोकप्रिय झाले. आता त्यांच्या जबरदस्त चाहते आहेत. अलिकडेच त्यांनी माधुरी दीक्षितच्या डान्स रियालिटी शो 'डान्स दिवाने'च्या सेटवर हजेरी लावली. तेव्हा त्यांची भेट सुपरस्टार गोविंदाशी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गोविंदा भेटताच...


सेटवर गोविंदाला पाहताच डब्बू अंकलने त्याचे पाय धरले. गोविंदाने त्यांना मिठी मारली. त्यानंतर दोघांनी एकत्र डान्स केला. सेटवर गोविंदा आणि डब्बू अंकल हे एकत्र 'मैं से मीना से न साकी से...दिल बहलता है मेरा आपके आ जाने से' या गाण्यावर थिरकले. 



डब्बू अंकलची स्वप्नपूर्ती


डब्बू अंकल गोविंदाचे जबरदस्त फॅन आहेत. गोविंदाला भेटून त्यांचे मोठे स्वप्न पूर्ण झाले. गेल्या दोन आठवड्यापासून डब्बू अंकल चांगलेच चर्चेत आहेत. आता तर त्यांना टी.व्ही. शोज आणि सिनेमांच्या ऑफर्स येत आहेत. काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टीने डब्बू अंकलचा डान्स पाहुन मुंबईत बोलवले. रिपोर्ट्सनुसार, सुनील शेट्टीने त्यांना हेराफेरी ३ मध्ये एका भूमिकेसाठी विचारले आहे. 



मुख्यमंत्र्यांनीही केले सन्मानित


इतकंच नाहीतर काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनीही डब्बू अंकलचा सत्कार केला.