मुंबई : 'संजू' सिनेमा रिलीज होऊन आता 5 आठवडे झाले आहेत. मात्र अजूनही रणबीर कपूर स्टार असलेल्या या सिनेमाची जादू काही कमी होत नाही. गेल्या 5 आठवड्यात या सिनेमाने फक्त देशातच नाही तर परदेशातही अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. आता 'संजू' ने नवा एक रेकॉर्ड रचला आहे. बॉलिवूड ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटकरून ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्तवरील ही बायोपिक ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कमाई करणारी तिसरी फिल्म ठरली आहे. संजूने बाहुबली 2 ला देखील मागे टाकलं आहे. या यादीत संजूच्या पुढे दंगल आणि पद्मावत हे दोन सिनेमे आहेत. 



या यादीत 3,163,107 ऑस्ट्रेलियन डॉलर कमाईसोबत 'पद्मावत' हा सिनेमा नंबर 1 वर आहे. दुसऱ्या नंबरवर दंगल हा सिनेमा आहे. या सिनेमाने आतापर्यंत 2,623,780 ऑस्ट्रेलियन डॉलर कमाई केली आहे. आता या यादीत 2,409,125 ऑस्ट्रेलियन कमाईसोबत 'संजू'ने तिसरा नंबर पटकावला आहे.