मुंबई : अभिनेता संजय दत्त याचा बायोपिक 'संजू' प्रदर्शित झाल्यानंतर कमाईचे अनेक रेकॉर्ड बनवत आहे. परंतु, प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला. हा सिनेमा फेसबुकवरही अपलोड करण्यात आला. शिवाय हा सिनेमा एका वेबसाईटवरही अपलोड करण्यात आला. 'टोरंट'वरही हा सिनेमा लीक करण्यात आला. काही युझर्सनं हा याचे स्क्रीन शॉट ट्विटरवरही शेअर केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारवाईच्या भीतीने नंतर मात्र, फेसबुकवरून हा सिनेमा हटवण्यात आला. परंतु, अद्यापही 'संजू' सिनेमाची हाय डेफिनेशन प्रिंट इंटरनेटवर पाहायला मिळतेय. रणबीरच्या फॅन्सनं यावर आपली नाराजी व्यक्त केलीय... तसंच प्रेक्षकांना हा सिनेमा सिनेमाघरात जाऊन पाहण्याची विनंती केलीय. 


अधिक वाचा - Sanju सिनेमाची दुसऱ्या दिवशी एवढी कमाई


'संजू' या सिनेमानं पहिल्या दिवशीच भारतात ३४.७५ करोड रुपये कमावले होते. याशिवाय ट्रेड अॅनालिस्ट रमेश बालाच्या माहितीनुसार, या सिनेमाने दुसऱ्या दिवशी 39 करोड रुपयांची कमाई केली आहे. तर रेस 3 ने दुसऱ्या दिवशी 38.14 करोड रुपयांची कमाई केली आहे. 


अधिक वाचा -.. यामुळे 'संजू' बाबा स्वतःच्याच बायोपिकच्या स्क्रिनिंगला पोहोचला नाही?


या सिनेमात रणबीरशिवय या सिनेमात परेश रावल, मनिषा कोइराला, दिया मिर्झा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २०१८ च्या टॉप ५ सिनेमांत 'संजू' सध्या कमाईसाठी सर्वात वरच्या स्थानावर आहे.