मुंबई : कोरोनाने अनेकांना आपल्या माणसांपासू दूर केलं. पण कधी कधी एखाद्या व्यक्तीचं जाणं मनाला चटका लावून जातं. आज तक चे वृत्त निवेदन रोहित सरदाना यांचं शुक्रवारी कोरोनामुळे निधन झालं. यांच्या निधनामुळे मीडिया क्षेत्रातील आणि प्रेक्षक वर्गातून खूप हळहळ व्यक्त करण्यात आली. (Sankarshan Karhade emotional post for TV Journalist Rohit Sardana ) रोहित सरदाना आपल्या वृत्त निवेदनामुळे सगळ्यांशी जोडले गेले होते. पण त्यांच्या निधनाची बातमी सगळ्यांनाच सुन्न करणारी होती. असं असताना मराठमोळा संवेदनशील अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांने आपली भावना व्यक्त केली आहे. 


भावनांना मोकळी करून दिली वाट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही ऋुणानुबंध शब्दात सांगताच येत नाहीत.. त्यांना भेटीची गरज असतेच असंही नाही.... ते फक्तं जोडले जातात. मी ह्या व्यक्तीचं वृत्तनिवेदन नेहमी पहायचो, ऐकायचो.. घरी नसलो तर; you tube वर पहायचो.. Live chat session मध्ये येणाऱ्या उर्मट आणि उद्धट प्रश्नांना हसुन योग्यं उत्तरं देणारा .... स्पष्टवक्ता , अभ्सासु , हजरजबाबी .... “ रोहित सरदाना ..” गेला  माझ्याशी रोज बोलणारा / भेटणारा मित्रं गेलाय कि काय असं वाटावं ईतका disturb झालोय मी. मला फार फार वाईट वाटलंय


काही ऋुणानुबंध शब्दात सांगताच येत नाहीत.. त्यांना भेटीची गरज असतेच असंही नाही.... ते फक्तं जोडले जातात. मी ह्या...

Posted by Sankarshan Karhade on Friday, April 30, 2021

संकर्षण कऱ्हाडे हा अतिशय हळवा अभिनेता असून तो अनेकदा सामाजिक गोष्टींवर व्यक्त होत असतो. रोहित सरदाना यांच जाण हे अनेकांसाठी दुःखद घटना आहे. त्यांना दोन लहान मुली आहेत. याबाबत ही सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करत आहे.


रोहित सरदाना यांनी वेगवेगळ्या प्रसिद्ध वृत्त वाहिन्यांवर वृत्तनिवेदक म्हणून काम केलं होतं. स्टुडिओमधन अँकरिंग करताना थेट जनसामान्यांच्या प्रश्नाला हात घालून नेत्यांना बोलते करण्याची कला रोहित सरदाना यांची खास मानली जायची. त्यांचे अकाली निधन पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी एक मोठा धक्का आहे. झी मीडियामध्ये त्यांनी बरीच वर्षे काम केलं होतं. 'ताल ठोक के' हा त्यांचा लोकप्रिय डिबेट शो होता.