Oscars 2025: किरण रावच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाला 2025 च्या ऑस्करमध्ये अधिकृत एन्ट्री मिळाल्यानंतर आता हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत भारतातून आणखी एका चित्रपटाचे नाव पुढे आले आहे. 2025 मध्ये होणाऱ्या ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म म्हणून संध्या सूरीचा 'संतोष' हा चित्रपट युनायटेड किंग्डमने निवडला असल्याचे सांगितले जात आहे. आता त्यांची अधिकृत एन्ट्री देखील झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, या चित्रपटाची निवड बाफ्टाने केली आहे. 'संतोष' या चित्रपटामध्ये शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा प्रीमियर देखील कान्स चित्रपट महोत्सव 2024 मध्ये झाला होता. ज्यावेळी संपूर्ण कलाकार उपस्थित होते. हा चित्रपट यूकेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित झाला होता. 


कोण आहेत 'संतोष' चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक?


'संतोष' या चित्रपटाची निर्मिती माइक गुड्रिज, जेम्स बोशर, बाल्थाझार डी गॅने आणि ॲलन मॅकलेक्स यांनी केली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अमा अम्पाडू, इवा येट्स, डायरमिड स्क्रिमशॉ, लुसिया हस्लॉर आणि मार्टिन गेरहार्ड आहेत. चित्रपटाची निर्मिती गुड केओसने केली आहे. याचे सह-निर्माते रेझर फिल्म आणि हौते एट कोर्ट आणि BFI आणि BBC यांनी पैशांची मदत केली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 काय आहे चित्रपटाची कहाणी? 


संध्या सूरी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक इन्वेस्टिगेटिव थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात एक नवविवाहित स्त्री आहे. मात्र पतीच्या निधनानंतर पत्नीला पोलीस कांस्टेबलची नोकरी लागते. त्यानंतर ती एका मुलीच्या हत्येचे गूढ उकलताना दिसत आहे. या चित्रपटात प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री शहाना गोस्वामीने 'संतोष'ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे शूटिंग हे लखनऊमध्ये झाले आहे.  


कोण आहे संध्या सूरी?


 संध्या सूरी ही एक ब्रिटिश-भारतीय चित्रपट आणि माहितीपट निर्माता आहे. तिचे वडील यशपाल सूरी 1966 मध्ये भारतातून इंग्लंडला आले होते. संध्याने Mathमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. मात्र, तिला 'National Film and Television School'मध्ये डॉक्युमेंट्रीचा कोर्स करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाल्याने तिचे आयुष्य बदलले. आत्तापर्यंत संध्याने फक्त चार प्रकल्प केले आहेत. ज्यात दोन माहितीपट, एक लघुपट आणि एक फीचर फिल्म यांचा समावेश आहे.