मुंबई : मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचं सत्र सुरुचं आहे. लोकप्रिय ओरिया टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मिरेखा ओझाच्या आत्महत्येनंतर तिच्या बॉयफ्रेंडचं देखील निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना सुसाईड नोट देखील ताब्यात घेतली.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, 23 वर्षीय रश्मीच्या वडिलांनी या प्रकरणात मुलीचा लिव्ह-इन पार्टनर संतोष पात्रा याचा हात असण्याची शक्यता व्यक्त केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 6 जुलै रोजी संतोष पात्राचा मृतदेह बसंती कॉलनी, राउरकेला, ओडिशातील घरातून सापडला. बुधवारी रात्री उशिरा संतोषने आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. 


संतोषने राहत्या घरातील खालीत गळफास घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. संतोषला खोलीत लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  मात्र नंतर डॉक्टरांनी संतोषला मृत घोषित केलं. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 



दरम्यान, रश्मिरेखाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस संतोषची चौकशी करत होते. रश्मिरेखाच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी, संतोषने तिचे घर सोडले आणि दुसरीकडे राहायला गेला. 


काय म्हणाली संतोषची आई?
रश्मिरेखाच्या आत्महत्येनतंर  संतोष 'मानसिकरित्या अस्वस्थ' होता. म्हणूनच त्याने हे गंभीर पाऊल उचलले. असं त्याच्या आईचं म्हणणं आहे. एवढंच नाहीतर, याआधी देखील त्याने अनेक वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 


त्या पुढे म्हणाल्यास, 'आम्ही त्याला अनेकदा थांबवलं. पण शेवटी संतोषने आत्महत्या केलीचं...' असं वक्तव्य संतोषच्या आईने केलं आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


रश्मिरेखाची सुसाईड नोट
 पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रश्मीने एक सुसाइड नोट देखील सोडली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पुढे घटना कोणत बण घेते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.