मुंबई : अभिनेत्री सारा अली खान चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण नुकतीच साराने तिच्या इंस्टाग्रामवर अशी पोस्ट केली आहे, ती पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की सारा खरंच कोणाला तरी खूप मिस करत आहे. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर  8 फोटो शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, मला पर्वतांची खूप आठवण येत आहे. विशेषतः सूर्याच्या किरणांची...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सारा अली खानने तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी 8 फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो वेगवेगळ्या ठिकाणची आहेत ज्यात साराचा वेगळा लूक दिसत आहे.



साराच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूरसह 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. सारा तिच्या अभिनयामुळे आणि स्वभावामुळे कायम चर्चेत आहे. सध्या ती तिच्या 'अतरंगी रे' चित्रपटामुळे चर्चेत आहे.