सारा अली खानच्या नव्या लुकची चर्चा
अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान `केदारनाथ` चित्रपटातून लवकरच पदार्पण करत आहे.
नवी दिल्ली : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' चित्रपटातून लवकरच पदार्पण करत आहे. बॉलिवूडच्या लोकप्रिय स्टार किड्समध्ये तिचे नाव जास्त प्रसिद्ध आहे.
आपल्या सिनेमाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण केल्यानंतर ती बांद्रा येथे दिली. त्यावेळी तिने सफेद रंगाचा ट्रेडिशनल रुपात दिसली. याआधी ती शनिवारी दिपिका पादुकोनच्या पार्टीमध्ये दिसून आली होती.
एरवी ती नेहमी खरेदी किंवा जिमला जाताना नजरेस पडते. तिच्या सोबत नेहमी एक पुस्तक असते. फावल्या वेळेत तिला पुस्तक वाचायला आवडते.
ती लवकरच 'केदारनाथ'मध्ये दिसणार आहे. अभिषेक कपूरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सारा सोबत सुशांत सिंग राजपूत प्रमुख भूमिकेत दिसेल.
काही कारणास्तव चित्रपटाचे शूटिंग काही काळ थांबविले असून फिल्मची रिलीजची तारीख पुढेही ढकलली आहे. म्हणूनच हा सिनेमा पुढच्यावर्षी डिसेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो साभार : बॉलिवूड लाईफ. कॉम )