Sara on Being in relationship with Shubhaman Gill : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा चांगलाच चर्चेत असतो. त्याचा सध्या 8 वा सीझन सुरु आहे. या शोचे दोन एपिसोड आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. आता या चित्रपटाचा तिसरा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात दोन जवळच्या मैत्रिणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या जोडी आहे ती म्हणजे अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे. यावेळी सारा आणि अनन्या त्यांच्या लव्ह लाईफ विषयी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला करण जोहर आणि सारानं अनन्याला चिडवले. त्याचं कारण म्हणजे तिच्या आणि आदित्य रॉय कपूरच्या डेटिंगच्या चर्चा. त्यानंतर आता सारा अली खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सारा अली खानला तिच्या आणि शुभमनच्या डेटिंगच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिनं थोडक्यात हिंट दिली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करण जोहरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओत करण सारा अली खानला विचारतो की 'तुझ्या आणि शुभमन गिलच्या डेटिंगबद्दल खूप चर्चा सुरु असतात आणि यावर उत्तर देताना सारा हसते आणि बोलते, सारा का सारा दुनिया गलत सारा के पीछे पडा है.' हे ऐकताच सगळ्यांना हसू अनावर झाले. 


खरंतर या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तेव्हा सुरु झाल्या होत्या, जेव्हा शुभमन आणि सारा अली खान एकदा हॉटेलमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलरकरसोबत जोडण्यात आले. सारा तेंडुलकर आणि शुभमनला अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यांचे व्हिडीओ आताही अनेकदा व्हायरल होतात. दरम्यान, आता सारा अली खाननं केलेल्या वक्तव्यानंतर सारा तेंडुलकर ही शुभमन गिलला डेट करते अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. 


हेही वाचा : 13 वर्षांनी मोठा असलेल्या आदित्यला डेट करते अनन्या! सारा अली खानकडूनच झाला खुलासा?


दरम्यान, सारा अली खानबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसापूर्वी तिच्या आणि कार्तिक आर्यनच्या डेटिंगच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, सारानं यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या एपिसोडमध्ये सारानं अनन्या पांडेच्या रिलेशनशिपची देखील हिंट दिली आहे. करण जोहर साराला विचारतो की अशी कोणती गोष्ट आहे जी अनन्याकडे आहे आणि तुझ्याकडे नाही. त्यावर उत्तर देत सारा म्हणजे - ‘A नाइट मॅनेजर’. सारानं दिलेलं उत्तर ऐकताच अनन्या लाजते आणि बोलते की 'मला अनन्या कॉय कपूर असल्याचं वाटतं आहे.'