Sara Ali Khan on Roaming Charges in Dubai: नुकताच आयफा पुरस्कार हा दुबईमध्ये संपन्न झाला आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे दुबईत रंगलेल्या या सोहळ्याची. यावेळी बॉलिवूडचं अख्खं तारागंण या सोहळ्याला उपस्थित होतं त्यामुळे यावेळी तारेतारकांचीही बरीच चर्चा रंगली होती. सारा अली खाननंही या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली होती. तिचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं तिनं यावेळी हजेरी लावली होती. तिचे अनेक व्हिडीओज यावेळी व्हायरल झाले होते. त्यापैंकी एका व्हिडीओची सगळीकडेच चर्चा रंगली होती. यावेळी तिनं दुबईमध्ये असलेले 400 रूपयांचे रोमिंग चार्जेस भरले नाहीत आणि वायफायही आपल्या हेअरड्रेसरकडून घेतलं होतं. नक्की काय घडलं चला जाणून घेऊया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सारा अली खान ही आज बॉलिवूडची टॉप स्टार आहे. 2018 पासून तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. आजच्या तरूणाईला सारा अली खान भुरळ पाडते. तिच्या फॅशनपासून ते तिच्या लुकपर्यंत सर्वांचीच चर्चा होताना दिसते. यावेळी तिच्या या व्हिडीओचीही प्रचंड चर्चा होताना दिसते आहे. मध्यंतरी समाजमाध्यमांतून सारा अली खान फार साधी जीवनशैली फॉलो करत याबद्दल अनेक बातम्या फिरत होत्या. ते खरंही आहे. आपल्याला आईसह शॉपिंग गेलेली साराही अनेकदा महागडे कपडे, वस्तू घेत नाही. या व्हिडीओतून आता त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलेला आहे. 


दुबईमध्ये पार पाडलेल्या आयफा 2023 मधला तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गाजतो आहे. ब्रुट इंडियाशी बोलताना तिनं कबुल केलं. ती म्हणाली, मी कंजूष आहे. तिच्या एका निर्मात्यानं तिला सांगितलं की तिनं मोबाईल फोनमध्ये प्रवास करताना रोमिंग सुरू करावं परंतु हे तिनं करणं नाकारलं कारण अबूधाबीला ती फक्त एका दिवसासाठी आली होती. 


ती म्हणाली की मी आणि विकी येथे आयफाला आलो आहोत. आम्ही एकमेकांशी सहकार्य करतो आहोत. त्यासोबत मी माझ्या निर्मात्यासह दिनो, दिनेश विजनसोबतही सहकार्य करते आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु त्यानं मला सकाळी सकाळी व्हॉट्सअपवर एक व्हॉइस मेसेज पाठवला की, रोमिंग 400 रूपयांना आहे, कृपया घेऊन टाक'. मी तर माझा हॉटस्पॉटही माझ्या हेअरड्रेसरकडून घेत होते आणि मला अद्यापही रोमिंग मिळत नव्हतं. म्हणजे मी असं वागायला नको होतं.'' 


हेही वाचा - स्पॉटलाईट अलर्ट! 'टायटॅनिक'मधला जॅक नीलमच्या प्रेमात?


ती इतरांना रोमिंग मिळतंय का? असा प्रश्न विचारत होती. हे फक्त तिलाच मिळत नव्हतं तेव्हा ती असं वाटलं अरे हे मलाच मिळत नाहीये? त्यावर ती म्हणाली, ''मला वाटलं रोमिंग महिन्याच्या हिशोबानं असेल परंतु येथे मी फक्त एकच दिवसासाठी आले आहे. तेव्हा मी विचार केला मी का म्हणून घ्यावं? त्यापासून वाचून राहा.'' 


तिला कळलं की, 10 दिवसांसाठी रोमिंग चार्जेस 3000 रूपये इतके आहेत. तेव्हा त्यावर साराची प्रतिक्रिया अशी होती की, ''काय इतके पैसे तेही एका दिवसासाठी? मी एका दिवसासाठी येथे आले आहे. 10 दिवसांसाठी घेऊन मी काय करू? त्यातून मला कळलं की एका दिवसासाठी रोमिंग चार्जेस 400 रूपये इतके आहेत''. सध्या तिचा हा व्हिडीओ हा चर्चत आहे.