स्पॉटलाईट अलर्ट! 'टायटॅनिक'मधला जॅक नीलमच्या प्रेमात?

Leonardo DiCaprio spotted with Indian origin model Neelam Gill: 'टायटॅनिक'चा लिओनार्डा डायकॅपरिओ सध्या लंडनमध्ये स्पॉट झाला आहे. यावेळी त्याच्यासोबत भारतीय वंशाच्या मॉडेल नीलम गिलही होती. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 2, 2023, 12:43 PM IST
स्पॉटलाईट अलर्ट! 'टायटॅनिक'मधला जॅक नीलमच्या प्रेमात? title=
फाईल फोटो

Leonardo DiCaprio spotted with Indian origin model Neelam Gill: 'टायटॅनिक' चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. या चित्रपटाचे नाव घेतले की तुमच्या डोळ्यासमोर पहिलं काय येतं? नक्कीच... जॅक आणि रोझची लव्ह स्टोरी. रोझच्या प्रेमात अखंड बुडालेल्या जॅकचं प्रेम पाहून आपण हलकेच त्याच्या प्रेमात पडतो त्यामुळे असाच काहीसा जोडीदार आपल्याला हवा अशी प्रत्येक मुलीची मनोमनं इच्छा असतेच. परंतु रूपेरी पडद्यावर असा रोमॅण्टिक वाटणारा हा अभिनेता पर्सनल आयुष्यात अद्यापही अविवाहित आहे परंतु त्याच्या डेटिंगच्या चर्चा या अनेकदा रंगलेल्या दिसतात.

त्यामुळे आपल्या डेटिंगच्या चर्चांमध्ये तो कायमच स्पॉटलाईटमध्ये असतो.  आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. दोन दिवसांपुर्वी तो भारतीय वंशांची ब्रिटिश मॉडेल नीलम गिलला डेट करतो आहे का याची चर्चा रंगली आहे. 'टायटॅनिक' चित्रपटाचा हिरो लिओनार्डो डायकॅपरीओ भारतीय वंशाची मॉडेल नीलम गिल हिच्याशी डेट करतो आहे का याच्या चर्चा रंगल्या आहेत. 31 मे रोजी तो एका हॉटेलच्या बाहेर आपल्या आईसोबत स्पॉट झाला परंतु यावेळी त्याच्यासोबत नीलम गिलही होती. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं आहे.

लिओनार्डा हा सध्या सिंगल आहे. परंतु आता तो भारतीय वंशाच्या मॉडेलला डेट करतो आहे का याची चर्चा रंगली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, लिओनार्डा डायकॅपरिओ मॉडेल नीलम गिलसोबत मंगळवारी रात्री लंडमध्ये स्पॉट झाला. (Leonardo dicaprio seen hanging out with indian origin british model neelam gill in london with his mom)

हेही वाचा - कधीकाळी केटरिंग बॉय म्हणून लग्नात जेवण वाढणारी 'ही' व्यक्ती आज सेलिब्रिटी शेफ; नावावर कोट्यवधींची संपत्ती

खरंच करतायत एकमेकांना डेट? 

यावेळी त्यांचे फोटो पापराझींनी काढले आहेत. त्यानं यावेळी ब्लॅक बेसबॉल कॅप आणि ब्लॅक फेस मास्क घातला आहे. तो यावेळी संपुर्ण ब्लॅक आऊटफिटमध्येही होता. यावेळी त्याची आई इर्मेलिन इंडेनबिर्केनही होती. परंतु ते दोघं एकमेकांना डेट करत नसून लिओनार्डोच्या एका जवळच्या मित्राला गेल्या काही दिवसांपासून नीलम डेट करते आहे, असं नीलमच्या एका प्रतिनिधीनं पोस्टला माहिती दिली आहे. परंतु काही रिपोर्ट्सनुसार असे कळते की, ते दोघं लवकरच आपल्या रिलेशनशिपची ऑफिशियल अनाऊंन्समेंट करणार आहेत. सोबतच लिओनार्डोच्या आईनंही त्याच्या नात्याला परवानगी दिली आहे. परंतु अजूनही याबद्दल लिओनार्डाची कमेंट आलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे नीलम गिल? 

नीलम ही इंग्लंडस्थित मॉडेल आहे. तिचा जन्म 27 एप्रिल 1995 रोजी इंग्लंडमध्ये झाला. तिचे आजी आजोबा हे पंजाबचे आहेत. ती व्यवसायानं मॉडेल आहे. मेच्या सुरूवातीला गिग हदीदला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर ते अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना अधिकच उधाण आले होते.