मुंबई : एप्रिल महिना सुरू झाला आहे. हवामानात देखील बदल झाले आहेत.  वसंतऋतूला ही सुरुवात झाली आहे. अशातच सारा अली खानला तिच्या जुन्या दिवसांची आठवण झाली, आणि जुने दिवस आठवत साराने तिच्या बीएफएफ बरोबर  थ्रोबॅक फोटो शेअर केले आहे. साराने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये सारा आणि तिचा बीएफएफने डोंगर आणि निसर्गाच्या सानिध्यात फोटो काढले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वसंत, उन्हाळा, शरद , हिवाळा .... आणि वसंत ... मला परत घेऊन जा' असं लिहत साराने बीएफएफ 'जहांन हांडा'बरोबर फोटो शेअर केला आहे. याफोटोमध्ये सारा तिच्या मित्राबरोबर डोंगर आणि नदीकाठी भरपूर आनंद घेताना दिसत आहे.



इतक्या सुंदर ठिकाणी कोणाला वेळ घालवायला आवडत नाही, खासकरुन जेव्हा वसंतऋतू  सुरु असेल. तेव्हा तर अशा नैसर्गीक ठिकाणाचं रुपच काहीसं वेगळ असतं. त्यामुळे कदाचीत साराला या जुन्या दिवसांची आठवण आली असावी. यामध्ये ते एका फोटोत उबदार कपड्यांमध्ये दिसत आहे, तर दुसर्‍या फोटोत ते नदीकाठी उन्हाळ्याच्या कपड्यात (Summer Look) दिसत आहेत.


कामा बद्दल बोलायचं झालं तर, सारा अली खान आता 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली आहे.


सारा  'कुली नंबर 1' चित्रपटात वरुण धवन सोबत दिसली होती. हा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. त्यामधले साराचे काम देखील लोकांना फारसे आवडले नाही. आता  सारा 'अतरंगी रे'मध्ये आपली जादू चालवून प्रेक्षकांना खूश करु शकेल का?  हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.