सारा अली खानने करण जोहरसोबत असं करायला नको होतं, बाथरुमध्येच....
करण जोहर पुन्हा एकदा त्याचा बहुचर्चित शो `कॉफी विथ करण` घेऊन आला आहे.
मुंबई : करण जोहर पुन्हा एकदा त्याचा बहुचर्चित शो 'कॉफी विथ करण' घेऊन आला आहे. सारा अली खान आणि धनुष त्यांच्या 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करणच्या शोमध्ये पोहोचले. जिथे दोघांनी खूप धमाल केली.सोबतच अनेक खुलासेही केले. यादरम्यान साराने खुलासा केला की, तिला स्वयंवर करायचं आहे. यावेळी तिने आपल्या आवडीच्या चार मुलांची नावंही सांगितली.
करण जोहरला का बसला धक्का?
सारा अली खान सध्या तिच्या 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनच्या वेळी ती कुठेही जात असली तरी चित्रपटातील चका-चका या गाण्यावर डान्स करते. करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण'मध्ये या गाण्याबाबत तिने असा खुलासा केला, जो ऐकल्यानंतर करण जोहरलाही धक्का बसला.
करण जोहरने गोव्यात ऐकलं होतं हे गाणं
करण जोहर साराला म्हणाला की, मला या गाण्याबद्दल कसं माहित आहे हे मी आता तुम्हाला सांगतो मी गोव्यात असताना हे गाणं आधी ऐकलं होतं. . हे तेच गाणं आहे का? ज्यासाठी सारा अपल्या असिस्टंट कोरियोग्राफरसोबत गोव्यात यायची, जिथे मी राहत होतो?
सारा करण जोहरचं बाथरूम वापरायची
करणच्या या बोलण्याला उत्तर देत सारा अली खानने मान हलवत होकार देत उत्तर दिलं. करण पुढे म्हणाला की, जेव्हा मी हे गाणं ऐकलं तेव्हा मला आठवलं की, हे तेच गाणं आहे ज्याची सारा रोज रिहर्सल करायची. सारा यानंतर लगेच म्हणाली की, तुझ्या बाथरूममध्ये मी रिहर्सल करायचे. मला हे तुला सांगायचं नव्हतं पण आता सांगू शकते. तुझ्या खोलीतला आरसा खूप छोटा होता पण बाथरूममधला आरसा मोठा होता. करणला धक्का बसला आणि म्हणतो तू माझ्या बाथरूममध्ये चका-चकिंग करायचीस? सारा आणि करणचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.