Sara Ali Khan Bandra Bandstand: सारा अली खान ही आपल्या हटके लुकसाठी आणि फॅशनसाठी चांगलीच ओळखली जाते. सर्वत्र तिच्या चर्चा रंगताना दिसतात. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये ती तिच्या एका मैत्रीणीसोबत बॅण्डसॅण्डवर फिरताना दिसते आहे. यावेळी तिनं शॉट्स परिधान केली होती आणि त्यावर टी-शर्ट घातला होता. सोबतच हॅण्डबॅग घेतली होती. यावेळी तिनं बिनधास्त मनमोकळेपणानं फिरताना दिसली परंतु यावेळी मात्र तिला ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी ती तान्या घारवीसोबत स्पॉट झाली तिनंही साराप्रमाणेच आऊटफिट परिधान केला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अतिप्रचंड वेगानं व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या तिच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मुंबईचे वातावरण शांत आणि थंड झाले आहे. मुंबई मस्त पाऊस पडतो आहे. यावेळी ती या पावसाचा आनंद लुटताना दिसते आहे. यावेळी तिच्या आजूबाजूला कोणीही नसून ती आपल्या या निवांत क्षणाचा एन्जॉय करते आहे. सोबतच आपल्या मैत्रीणीसह ती गप्पा मारताना दिसते आहे. यावेळी पापराझींनी मात्र तिची ही झलक पकडली आहे आणि तिचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोवर नेटकरी नानाविध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. पापराझी मानव मंगलानी यानं आपल्या इन्टाग्राम हॅण्डलवरून साराचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिनं आपल्या एका फॅनसोबत सेल्फीही क्लिक केला आहे. त्यानंतर तिनं लक्झरीस कार सोडून चक्क रिक्षानं प्रवास केला आहे. 


हेही वाचा - ''बाबा दारू प्यायचे पण त्यादिवशी...'' वडीलांसोबतच्या नात्यातला 'तो' हळवा प्रसंग सांगताना 'देवमाणूस'फेम अभिनेत्री भावुक


यावेळी तिच्यावर नेटकऱ्यांनी चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सारा अली खान स्वत: एका रॉयल फॅमिलीतून आली आहे त्यामुळे तिची प्रतिमा ही लोकांसमोर वेगळी आहे. त्याचसोबतच ती एक सेलिब्रेटीही आहे त्यामुळे आपल्या या प्रतिमेला छेद देत तिनं रिक्षातून अगदी सर्वसामान्यांप्रमाणे प्रवास केल्यानं नेटकऱ्यांनी आणि खासकरून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षावही केला आहे. सारा अली खानचा आणि विकी कौशलचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. हा चित्रपट विशेष गाजलाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सारा अली खान आपल्या साध्या लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिच्याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते. ती कमी खर्च करते आणि लक्झरीयस लाईफही जास्त फोलो करताना दिसत नाहीत. त्यामुळे तिचे कौतुकही होताना दिसते.