Madhuri Pawar : प्रत्येकाच्या आयुष्यात एक हळवा प्रसंग असतोच. तसाच अशाच एका अभिनेत्रीच्या आयुष्यातही घटला आहे. वडील आणि मुलीचं नातंं हे अगदी हळवं असतं. वडिल ओरडतात पण ते आपल्या भल्यासाठी. त्यातून आपल्या लेकरांवर त्यांनी चुकून जरी हात उगारला तरीही त्यांना त्या आपल्या कृतीचे कायमच वाईट वाटतं राहते. असाच काहीसा एक प्रसंग एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या बाबतीत घडला आहे. सध्या तिनं एका मुलाखतीतून आपल्यासोबत घडलेला असाच एक प्रसंग शेअर केला आहे. 'रानबाजार' आणि 'देवमाणूस' फेम अभिनेत्री माधुरी पवार हे नाव तुमच्या आमच्या परिचयाचे आहे. माधुरी ही साताऱ्याहून मुंबईला आहे. तिचा जन्म साताऱ्यात अगदी गरीब घरात झाला. ती तिच्या अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. परंतु इथपर्यंत येण्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला आहे.
माधुरी पवार ही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोबतच तिचे इन्टाग्रावरही लाखो फॉलोवर्स आहेत. तिचे चाहते तिच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसतात. वर म्हटल्याप्रमाणे माधुरीला लहानपणापासून फार संघर्ष करावा लागला आहे. तिचे बालपण हे झोपडपट्टीत गेले. परंतु या घरात राहून तिनं आपले शिक्षणही पुर्ण केले. यावेळी तिनं 'इट्स मज्जा' या पोर्टलला एका मुलाखत दिली आहे. त्यावेळी तिला एक प्रश्न विचारण्यात आला ज्याचे तिनं अगदी प्रांजळपणे उत्तर दिले आहे. यावेळी तिनं एका घटनेवर भाष्य केले आहे. यावेळी आपला हा प्रसंग सांगताना नकळतपणे तिही भावुक झाली आहे.
हेही वाचा - ''नवराई माझी लाडाची...'' गाण्यावर निवेदिता सराफ यांचा तूफान डान्स; VIDEO मिनिटांत व्हायरल
ती म्हणाली की, ''एकदा आई-बाबांचं भांडण सुरू होतं. आता वडील दारू पित नाही, पण त्यावेळी प्यायचे त्यामुळे त्याचं मानसिक संतूलन ठीक नव्हतं. दारूच्या नशेत त्यांनी आईला मारण्यासाठी हात उचलला होता. तेव्हा मी मध्ये आले होते. त्यामुळे त्यांचा मार मला लागला. तेव्हा पहिल्यांदा मी दुर्दैवानं मार खाल्ला. त्यानंतर बाबांना खूप वाईट वाटलं होतं. त्यांनी मला मारलं म्हणून त्यांनी स्वत:च्या हाताला इजा करून घेतली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मारलं नाही. त्या एका घटनेशिवाय मला लहानपणापासून कधीच मार खाल्ला नाही.''
या प्रसंगावर तिचे चाहतेही तिच्यावर कौतुकचा वर्षाव करताना दिसत आहेत. माधुरी ही सातारा ते मुंबई कामासाठी प्रवास करते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून तिनं काम केलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली होती.