आता, `केदारनाथ` चित्रपटाच्या नावाला विरोध
चित्रपटात काही बदल होणार का की विरोध वाढणार?
देहरादून : केदारनाथ या चित्रपटाच्या विरोध होताना दिसतोय. चित्रपटाचे नाव आणि कथानकाला केदारनाथ येथील पुजारी विरोध करतायत. ७ डिसेंबरला येऊ घातलेल्या या चित्रपटातून सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अलीखान पदार्पण करतेय.
चित्रपटात सुशांत सिॆह राजपूत हा मुस्लिम पिठ्ठू अर्थात यात्रेकरुंना पाठिवर वाहून नेणाऱ्याची भूमिका साकारत असून सारा ही हिंदू यात्रेकरु आहे. २०१३ ला केदारनाथमध्ये आलेला प्रलय आणि त्या दरम्यान फुलणारी ही कथा आहे.
दरम्यान हा चित्रपट लव जिहादला प्रोत्साहन देत असून मुस्लिम पिठ्ठू केदारनाथ परिसरात नसतानाही हिंदू भावना दुखावण्याचा हा प्रयत्न असल्याचंही पुजारी संघटनेची भूमिका आहे.
केदारनाथ येथे चित्रित केलेल्या चित्रपटातील सारा आणि सुशांतच्या किसिंग सीनलाही विरोध आहे.
७ डिसेंबरला प्रदर्शित होणा-या या चित्रपटात काही बदल होणार का की विरोध वाढणार, हे पाहावं लागेल.