मुंबई : सारा अली खान सध्या आपल्या सिनेमांमधून आणि मुलाखतीमधून लोकांच मन जिंकत आहे. 2018 डिसेंबरमध्ये 'केदारनाथ' आणि 'सिंबा' या सिनेमांमधून साराने बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच गेल्या अनेक दिवसांपासून सारा अली खान खूप चर्चेत आहे. आता साराबद्दल आणखी एक गोष्ट समोर आली आहे. साराच्या खात्यात आणखी एक सिनेमा असल्याचं समजत आहे. महत्वाची बाब म्हणजे या सिनेमात साराने चक्क कतरिनाला रिप्लेस केलं आहे. 


सारा अली खान वरूण धवन स्टारर डान्स सिनेमा 'एबीसीडी 3' मध्ये दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून फिल्म मेकर अभिनेत्रीच्या शोधात होते. 


डान्सवर आधारित असलेल्या या सिनेमाकरता 'एबीसीडी 3'मध्ये जॅकलीन फर्नांडिस, श्रद्धा कपूर आणि कृती सेनन सारख्या अभिनेत्रींचा विचार केला. 


अशा बातम्या सतत समोर येत होत्या. पण अखेर या अनुभवी अभिनेत्रींना मागे टाकत स्टार किड असलेल्या सारा अली खानचा नंबर लागला आहे. 



बॉलीवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, सारा अली खानचं नाव 'एबीसीडी 3' करता निश्चित झालं आहे. या सिनेमाकरता अगोदर कतरिनाच्या नावाची चर्चा सुरू होती. 


मात्र कतरिना कैफ सलमान खानच्या 'भारत' सिनेमाच्या शुटिंगमध्ये प्रचंड व्यस्त आहे. यामुळेच तिने हा सिनेमा सोडल्याचं कळतंय. 


कतरिना आपल्या प्रोफेशनल स्वभावामुळे ओळखली जाते. भारत आणि एबीसीडीच्या डेट्स क्लॅश होत होत्या त्यामुळे तिने एबीसीडी 3 हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला. 


एबीसीडी 3 मध्ये कोरिओग्राफर, अभिनेता आणि फिल्ममेकर प्रभुदेवासोबत राघव जुयाल, धर्मेश येलांडे, पुनीत पाठक मुख्य भूमिकेत आहेत.