ते वेगळेच चांगले होते; आई-वडिलांबाबत बॉलिवूड अभिनेत्री हे काय म्हणतेय?
`वयाच्या नवव्या वर्षी मी माझ्या आई-वडिलांना वेगळं होताना पाहिलं आहे...`
मुंबई : अभिनेत्री सारा आली खान बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि रॉयल कुटुंबातील मुलगी आहे. सारा अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी आहे. सारा जेव्हा फक्त 9 वर्षांची होती तेव्हा सैफ आणि अमृता विभक्त झाले. नुकताचं एका मुलाखतीत साराने आई-वडिलांच्या घटस्फोटावर उघडपणे आपलं मत मांडलं आहे. 1991 साली सैफ आणि अमृताने लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर 2004 साली दोघे विभक्त झाले. त्यानंतर 2014 साली सैफने अभिनेत्री करीनासोबत लग्न केलं.
आई-वडिलांच्या नात्याबद्दल सारा म्हणते...
सारा म्हणाली, 'मी कधी माझ्या आई-वडिलांना एकत्र आनंदी पाहिलं नाही. त्यानंतर मी अचानक त्यांना आनंदी पाहिलं. मी माझ्या वयाच्या मुलांपेक्षा जास्त समजदार आहे. कारण मी लहानपणी माझ्या आई-वडिलांना विभक्त होताना पाहिलं आहे. 9 वर्षांची असताना माझे आई-वडिल एकमेकांसोबत आनंदी नसल्याचं मी पाहिलं...'
पुढे सारा म्हणाली, 'आम्ही आई-वडिलांसोबत एकत्र राहत होतो. पण ते दोघे आनंदी नव्हते. काही दिवसांनंतर दोघे अचानक विभक्त झाले. दोघांनी वेगळ्या घरात रहायला सुरूवात केली. वेगळे राहून ते दोघे आनंदी होते. वेगळं राहणं त्यांच्यासाठी कठीण नव्हतं.....'
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच अक्षय कुमार आणि दक्षिणेतील सुपरस्टार धनुष यांच्यासोबत आनंद एल राय दिग्दर्शित 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटात सारा दुहेरी भूमिका साकारतना दिसणार आहे.