मुंबई : अभिनेत्री सारा अली खान आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनय आणि खोडकर स्वभावामुळे साराने चाहत्यांच्या मनात अधिराज्य निर्माण केलं आहे. काही वर्षांपूर्वी साराने दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली. आता पुन्हा साराने 'कॉफी विथ करण'च्या सातव्या भागात प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. करणच्या शोमध्ये  या आठवड्यात बॉलिवूडच्या दोन बेस्ट फ्रेंड्स सारा अली खान आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या एपिसोडचा ट्रेलर करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये करण जान्हवी आणि सारासोबत मस्ती करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये, करण जोहर सारा अली खानला एका मुलाचे नाव सांगण्यास सांगतो ज्याला तिला सध्या डेट करायचे आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करणने प्रश्न विचारल्यानंतर सुरुवातीला सारा सर्व उत्तर देण्यास नकार देते, नंतर सारा अभिनेता विजय देवराकोंडा याचं नाव घेते. पुढे करण साराला तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल विचारतो. 


करणच्या या प्रश्नाचं उत्तर देताना सारा म्हणते, 'तो सर्वांचाचं एक्स आहे.' महत्त्वाचं म्हणजे याआधी सारा आणि कार्तिक दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याचं समोर आलं.