मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो. सारा बॉलिवूडमधील एक सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे. साराने अनेक मोठ्या स्टार्ससोबत सिनेमांत काम केलंय. लवकरच सारा मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. साराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा साराचं नाव कार्तिक आर्यन आणि सुशांत सिंह राजपूतसोबत जोडलं गेलं. मात्र खूप कमी लोकांना साराच्या लव-लाइफबद्दल माहित आहे. या व्यक्तीच्या प्रेमात सारा अली खान अगदी दीवानी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा अली खान या अगोदर वीर पहरिया (Veer Pahariya) या मुलाला डेट करत होती. वीर मोठ्या राजकीय कुटुंबातील आहे. वीरचे आजोबा केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आहे. सारा बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी वीरल डेट करत होती.या दोघांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र काही काळ एकत्र राहिल्यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला.  



एका मुलाखतीत साराने म्हटलं होतं की,'वीरशिवाय माझ्या आयुष्यात दुसरा कोणताच मुलगा नाही. तो खूप चांगला माणऊस आहे. वीर माझ्यासोबत अगदी सहज वागतो. रस्त्यावर उतरून डोसा खाण्यासही तो तयार असो. वीरसोबत माझं ब्रेकअप नक्कीच झालाय मात्र त्याने कधी माझं हृदय तोडलं नाही.'



सारा अली खानच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री अलीकडेच तिच्या कुली नं. या चित्रपटात सारा अली खानसोबत वरुण धवन दिसला. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री तिच्या पुढील चित्रपटांचे शूटिंग करत आहे. जिथे ती लवकरच तिच्या "अतरंगी रे" चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुष या अभिनेत्रीसोबत दिसणार आहेत.