मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या चर्चा नेहमीच वाऱ्यासारख्या पसरत असतात. परंतू अता सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. विमानतळावर सारा स्वत:च आपली ट्रॉली सांभाळताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांकडून साराच्या व्हायरल व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. सेलेब्रिटी किड्सपैकी एक असलेली सारा मनात कोणताही संकोच न बाळगता स्वत:च काम स्वत: करण्याचा संदेश देत आहे, असं बोलणं वावगं ठरणार नाही.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगताना दिसत आहेत. ऐवढेच नाही तर कार्तिक तिच्या कुटुंबासोबत जवळीक निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. त्याप्रमाणे दिल्लीमध्ये पहिल्यांदाच साराने फॉशन शोमध्ये रॅम्प वॉक केले. यावेळेस साराचा उत्साह वाढवण्यासाठी चक्क कार्तिक त्याठिकाणी उपस्थित होता. 


कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.