मुंबई : 'एक,दो,तीन..' या गाण्यावरून सध्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 'तेजाब' चित्रपटात धक धक गर्ल माधुरी दीक्षितवर एक दो तीन हे गाणं शूट करण्यात आलं होतं. आजही या गाण्याची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे.  


बागी 2 मध्ये पुन्हा आलं एक दोन तीन   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आगामी बागी 2 चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी ही जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सोबतच या चित्रपटामध्ये जॅंकलीन फर्नांडीसवर एक,दो,तीन हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. मात्र या गाण्याला प्रेक्षकांनी ट्रोल केलं आहे. 


 



 सरोज खान यांची प्रतिक्रिया  


 तेजाबमधील 'एक दो तीन'... या गाण्याला सरोज खानचं नृत्यदिगदर्शन होतं. तर हे गाणं माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आलं आहे. प्रेक्षकांनी उघडपणे या गाण्यावर नापसंती व्यक्त केली आहे. त्यानंतर सरोज खाननी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. काही मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, तेजाबचे निर्माते एन चंद्रा सोबत सरोज खान 'एक दो तीन..' या गाण्याच्या रिमेक विरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यावर सरोज खान यांनी उघडपणे कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.  एक,दो,तीन.. गाण्यावर करिना कपूरच्या दिलखेचक अदा ....


सलमान खानने केलं कौतुक  


माधुरी दीक्षितचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे. माधुरीच्या बहारदार नृत्याने सजलेल्या या गाण्याची बागी २ मध्ये वाट लागली आहे, असे दिग्दर्शक एन. चंद्रा यांचे म्हणणे आहे. मात्र जॅकलिनच्या या गाण्यावरून उठलेल्या वादावर तिचा को-स्टार सलमान खानने तिची बाजू घेतली आहे. सलमानने बुधवारी जॅकलिनचे हे गाणे शेअर करत तिचे कौतुक केले.एक दो तीन... गाण्यावर भडकले तेजाबचे दिग्दर्शक ; सलमानने घेतली बाजू


30 मार्चला रीलीज होणार चित्रपट 


माधुरी दीक्षितच्या गाण्याला सरोज खानने कोरिओग्राफ केले होतं तर अल्का याज्ञिकने गायलं होतं. जॅकलीनच्या रिक्रेटेड व्हर्जनला गणेश आचार्याची कोरिओग्राफी आहे तर श्रेया घोषालचा आवाज आहे. 'बागी 2'  चित्रपट 30 मार्चला रीलीज होणार असून साजिद नाडियाडवालाचे दिग्दर्शन आहे.