साजिदवर झालेल्या आरोपांनंतर बहिण सरोज खानची प्रतिक्रिया
साजिदवर आरोप झाल्यानंतर त्याची बहिण सरोज खानने ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वादानंतर #MeToo चळवळ अधिकच जोर धरू लागली आहे. अनेक स्त्रिया पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. यामध्ये साजिद खानवरही आरोप झाले आहेत. साजिदवर आरोप झाल्यानंतर त्याची बहिण सरोज खानने ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार करिश्मा उपाध्यायने फिल्ममेकर साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला. त्यानंतर दोन अभिनेत्रींनी देखील साजिद खानवर आरोप केले.
अभिनेत्री सलोनी चोप्रा आणि रॅचल वाइट आता समोर आल्या असून त्यांनीही साजिद खानने अनेक महिने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचं सांगितलंय.
या सर्व प्रकारानंतर अक्षय कुमारने हाऊसफुल 4 चं शुटींग थांबविण्यास सांगितलं तर साजिद खानने हा सिनेमा करणं थांबवलंय. आता खुद्द फराह खानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
फराहचं ट्वीट
ही वेळ आमच्या परिवारासाठी खूप वाईट आहे. काही कठीण मुद्द्यावर आम्हाला काम करावं लागतंय. जर माझ्या भावाने असं वर्तन केलं असेल तर त्याला या सर्वांचा सामनाही करावा लागेल. मी कोणत्याही परिस्थितीत या कृत्याचं समर्थन करणार नाही.
ज्या महिलांना यामुळे त्रास झालायं त्यांच्या पाठिशी मी उभी राहिनं असंही फराह खानने म्हटलंय.
साजिदवर आरोप केलेल्या रॅचलने 2014 मध्ये 'उंगली' या सिनेमांत इमरान हाशमीसोबत काम केलं होतं.
रॅचलने सांगितलं की, जेव्हा मी पहिल्यांदा साजिद खानला भेटले तेव्हा त्यांनी मला कपडे काढायला लावले. तसेच 'हमशकल्स' सिनेमाकरता माझ्या एजन्सीने मला साजिद खान यांना भेटायला सांगितलं.
हे बोलणं झाल्यावर अगदी 5 मिनिटांत साजीद खान यांचा फोन आला आणि त्यांनी मला इस्कॉन जुहूच्या समोरील बंगल्यात भेटायला बोलावलं. मी घरी भेटण्यासाठी कम्फर्टेबल नव्हती.
तेव्हा तो म्हणाला की, काळजी करू नकोस मी माझ्या आईसोबत इथे राहतो आणि ती देखील असेल.
रॅचल म्हणते...
'घरी पोहोचल्यावर त्याच्या मेडने मला हॉलमधून बेडरूममध्ये बसायला सांगितलं. तेव्हा मी सफेद टॉप आणि ब्लू जीन्स घातली होती.
पण साजिद मला इतक्या घाणेरड्या नजरेने बघत होता की, मला वाटलं मी कपडेच घातले नाहीत. त्यानंतर माझ्या जवळ आला आणि ब्रेस्ट बद्दल बोलायला लागला.
सिनेमांत हिरोइनला बिकीनी घालायची आहे असे सांगत त्याने मला कपडे काढायला सांगितले पण मी त्याला नकार दिला. असेच आरोप सलोनीने देखील केले आहेत.