प्रेग्नेंट नीना गुप्तासोबत लग्न करु इच्छीत होते, सतीश कौशिक.. म्हणाले, ``मुलाला आपलं नाव देऊ``
निना गुप्ता यांनी ऑटोबायोग्राफीच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा खुलासा केला.
मुंबई : सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेत्री निना गुप्ता यांच्याबद्दल. निना गुप्ता यांची ऑटोबायोग्राफी प्रदर्शित करण्यात आली आहे. अभिनेत्री करीना कपूरच्या हस्ते त्यांची ऑटोबायोग्राफी लाँच करण्यात आली. यावेळी निना यांनी त्यांच्या जीवनातील अनेक चांगले-वाईट अनुभव सांगितले आहेत. ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्याबद्दल देखील एक मोठा खुलासा केला आहे.
निना गुप्ता यांनी सांगितलं की, जेव्हा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्या मुलीला त्या जन्म देणार होत्या तेव्हा त्यांना सतीश कौशिक यांनी लग्नासाठी मागणी घातली होती. निना गुप्ता गरोदर असून देखील सतीश यांनी निना गुप्ता यांना लग्नासाठी विचारलं होतं. पण निना यांनी सतीश यांना लग्नासाठी नकार दिला.
बातमी : http://लग्नासाठी तयार होत्या निना गुप्ता; पण शेवटच्या क्षणी सर्वकाही संपलं
त्या म्हणाल्या, 'सतीश म्हणाले होते की, जर बाळाचा वर्ण माझ्यासारखा असेल तर आपण सगळ्यांना सांगू शकतो, की हे माझं बाळ आहे.' पण निना यांनी एकट्यांनी मोठ्या जिद्दीने आणि संघर्षांचा सामना करत त्यांच्या मुलीला वाढवलं. निना गुप्ता यांच्या मुलीचं नाव मसाबा असं आहे. निना गुप्ता यांनी ऑटोबायोग्राफीच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा खुलासा केला.
इंडस्ट्रीमधील राजनीती, कास्टिंग काऊच इत्यादी गोष्टींबद्दल निना यांनी सांगितंल आहे. निना यांचं माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड यांच्यासोबत अफेयर होतं. रिचर्ड विवाहीत होते. कालांतराने दोघे विभक्त झाले. अनेक अडचणींचा सामना करत असताना निना यांनी रिचर्डच्या मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा आसे असून त्यांनी सीए विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केलं आहे.