Savaniee Ravindrra baby Name : सावनीच्या बाळाचं नाव ठरलं, आहे `हा` अर्थ
सावनी रविंद्रने शेअर केली खास पोस्ट
मुंबई : गायिका सावनी रविंद्रने नुकतंच आपल्या बाळाचं नाव जाहीर केलं आहे. सावनीने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत आपल्याला कन्या रत्न झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. सावनीने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत बाळाचं नाव जाहीर केलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच मुलीचं आगमन झालं आहे.
काय आहे सावनीच्या बाळाचं नाव?
सावनीने आपल्या मुलीचं नाव 'शार्वी' असं ठेवलं आहे. शार्वी या नावाचा अर्थ सांगण्यासाठी तिने एक पोस्ट शेअर केली आहे. सावनी आपल्या पोस्टमध्ये सांगते की,'आजपासून आमच्या बाळाचं नाव,''शार्वी" (पार्वती देवी आणि दुर्गा देवीचे हे नाव आहे. तसंच या नावाचा अजून एक अर्थ म्हणजे दिव्य - दैवी ) आमच्या बाळाच्या पाठिशी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव राहू देत.
सावनीसाठी मुलगी ठरली लक्की
गायिका सावनी रविंद्र आणि पती डॉ. आशिष धांडे या दोघांच्या आयुष्यात एका चिमुकल्या लेकी आगमन झालं आहे. नुकतंच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
सावनीन पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली. सावनीने 2018 साली डॉक्टर आशिष धांडेशी लग्न केलं. सावनीने आपले बेबी बम्पसह सुंदर फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे.