पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभा केलेला चित्रपटाचा सेट तत्काळ काढावा, असे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. 


होणार कारवाई?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सिनेमाचा सेट विद्यापीठाच्या मैदानावर गेल्या काही दिवसांपासून लागला आहे. त्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. आता विद्यापीठाने नव्याने हे आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, सिनेमाचा सेट न काढल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. 


अद्याप सेट काढला नाही


आज सायंकाळी असे आदेश देण्यात आले. विद्यापीठाने मंजुळे यांच्याबाबत आतापर्यंत सहानुभूतीची भूमिका घेतली होती. मात्र, आता मंजुळे यांनी आदेशाचे पालन केले नाही तर कारवाई करण्यात येईल. ८ दिवसात सेट काढण्याची नोटीस विद्यापीठाने याआधी दिली होती. मात्र अद्याप सेट काढण्यात आला नाही.