Sayaji Shinde got Attacked by Honey Bee : लोकप्रिय अभिनेता सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे. सयाजी शिंदे हे नेहमीतच झाडांचं पुनर्रोपण करतात किंवा मग नवीन झाडं लावताना दिसतात. त्यांचे निसर्गावर असलेले प्रेम आपल्या सगळ्यांना माहित आहे. अशात सयाजी शिंदे यांनी पुणे बंगळुरु महामार्गावर झाडांचं पुनर्रोपण करत होते. तेव्हाच त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी तिथे असलेली अनेक झाडं ही तोडण्यात आली होती. त्यातील काही झाडं वाचवण्यासाठी त्या झाडांचं पुनर्रोपण करण्यासाठी  तिथेच उपस्थित होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाडांची पुनर्रोपण सुरु असताना त्या झाडांवर स्थित असलेल्या मधमाशा उठल्या आणि सयाजी शिंदे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या अनेक लोकांवर त्यांनी हल्ला केला. मधमाश्यांच्या अचानक हल्ल्यानं तिथं खूपच गोंधळ उडाला. मधमाश्या सयाजी शिंदे यांच्या डोळ्यावर आणि मानेला चावल्या. सध्या सयाजी शिंदे हे सुखरुप आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आता त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. 



सयाजी शिंदे यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांना जास्त काही झालं नसून दोन मधमाश्या चावल्याचे सांगत ते आता सुखरूप आहेत. त्यासोबत त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केल्याचे देखील सांगितले. येथे जवळजवळ 200 वर्षे जुनी ही झाडे आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी त्यांना तोंडण्यात येत आहे. ही झाडं तोडल्यानंतर येथे फक्त दोन-चार झाडे लावली जातात. पण त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही. त्यामुळेच आताच आम्ही पुढाकार घेत आहोत. 


हेही वाचा : VIDEO : शाहरुख- काजोलच्या हक्काची गोष्ट Aamir- Aishwarya च्या हाती; पाहा मग त्यांनी काय केलं...


सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. सयाजी शिंदे हे वृक्ष प्रेमी असून सगळ्यांना झाडे लावण्याचा संदेश देतात. सयाजी शिंदे यांनी मराठी-हिंदीसोबत दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर त्यांची छाप सोडली आहे. सयाजी शिंदे हे चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असले तरी खऱ्या आयुष्यात सयाशी शिंदे हे रियल लाईफ हीरो आहेत. 


दरम्यान, सयाजी शिंदे यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते लवकरच 'घर, बंदूक, बिरयानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर देखील दिसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज मंजुळे हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे नागराज मंजुळे आणि हेमंत आवताडे यांनी केले आहे.