मुंबई : 6 मार्चपासून नाशिकहून किसान सभेतर्फे आयोजित शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी रात्री हा मोर्चा आझाद मैदाावर पोहोचला.  हा लॉंग मार्चचा हा शेवटचा टप्पा असून आज हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.


शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर पोहोचला आहे.  हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेले हे लाल वादळ शनिवारी रात्री ठाणे शहरात दाखल झाले. मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आता हे शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार आहे. 


शेतकऱ्यांच्या मोर्चाला मराठी कलाकारांचा पाठिंबा 


किसान सभेतर्फे आयोजित केलेल्या या मोर्चाला अनेक राजकारणी मंडळींनी पाठिंबा दिला आहे. तसेच अनेकांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. आता यामध्ये मराठी कलाकार देखील सहभागी झाले आहेत. काहे दिया परदेस या मालिकेतील अभिनेत्री सायली संजीव हिने देखील फेसबुकच्या माध्यमातून नेटीझन्सना एख विनंती केली आहे.