मुंबई : 'टिक टिक वाजते ...' या गाण्यामधून घराघरात पोहचलेल्या सायली पंकजच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. 
सायली पंकज आणि पंकज पडघन या जोडीने सोशल मीडीयामधून त्यांना कन्यारत्न झाल्याची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 
काही दिवसांपूर्वी सायलीने प्री- मॅटर्निटी शूट केले होते. गरोदरपणातील तिचे खास फोटेही सायलीने सोशल मीडियावर शेअर केले होते. बाळ आणि सायली दोघंही आरोग्यदायी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 
१४ फेब्रुवारी २०१३ रोजी सायली आणि पंकज विवाहबद्ध झाले होते. सायली पंकजने सांग ना रे, मँगो डॉली, स्वप्न चालून आले यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. पंकज पडघम हे मराठी सिनेसृष्टीमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम करतात.