मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नानंतर आपल्या 'परी' या सिनेमामुळे चांगलीच आहे. याच सिनेमाचा दुसरा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांसमोर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'परी' म्हणजे सुंदर, देखणी अशी प्रतिमा तुमच्या डोळ्यांसमोर येत असेल तर अनुष्काच्या 'परी'च्या पहिल्याच टीझरनं ही प्रतिमा पार पुसून टाकली असेल. 'परी'चा दुसरा टीझर आता प्रेक्षकांची उत्सुकताना वाढवतानाच दिसतोय. 



या व्हिडिओ टीझरमध्ये अनुष्काचा लूक पूर्ण बदलताना दिसतोय. 'परी'ची टॅगलाईन आहे 'नॉट अ फेयरीटेल'... हा एक सुपरनॅच्युरल थ्रिलर सिनेमा असल्याचं यावरून लक्षात येतंय. 


क्लीन स्लेट फिल्म नावाच्या एका यु-ट्युब चॅनलवरून अनुष्काच्या 'परी'चा टीझर शेअर करण्यात आलाय. हा सिनेमा २ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.