मुंबई : गेल्या काही दिवसात पाकिस्तानातील एक मिस्त्री (गवंडी) सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. राज असे या  मिस्त्रीचे नाव असल्याची माहिती सोशल मीडियातूनच मिळते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या राज मिस्त्रीच्या डान्सचा व्हिडिओ आतापर्यंत लाको लोकांनी पाहिला आहे. आता तुम्ही म्हणाल, एका मिस्त्रीच्या व्हिडिओत पाहण्यासारखे ते काय? पण, तुम्ही जर हा व्हिडिओ पहाल तर तुम्हाला ध्यानात येईल की, नेटीझन्स हा व्हिडिओ इतक्या अधिक प्रमाणात का पाहात आहेत.