मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक कपलपैकी एक आहे. या कपलची एका झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते वेडे आहेत. या कपलने कदाचित त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी, त्यांचा एकत्र वेळ घालवणं या वस्तुस्थितीची साक्ष देते. आता त्यांचा एक न पाहिलेले फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या फोटोमध्ये अभिनेता रणबीर कपूर आलिया भट्टसोबत दिसत आहे. हा फोटो रणबीर आलियाच्या शेफने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये रणबीर आणि आलिया त्यांच्या खाजगी शेफ शास्त्रीसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. सोबतच रणबीर आलियाला जवळ घेतानाही  दिसत आहे. फोटो शेअर करत शेफने या कपलसोबत काम करण्याचा त्यांचा प्रवास शेअर केला 
आहे.



पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये  लिहिलंय की, 'दोन वर्षांपूर्वी मी तुमच्यासाठी शेफ हर्षला असिस्ट करायला सुरुवात केली. मी रणबीर आणि आलियासाठी खाजगी शेफ म्हणून काम करून आता ६ महिने झाले आहेत. जेव्हापासून मी स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. रोज काहीतरी शिकायला हवं. तुम्हा दोघांना काही मजेदार पदार्थ देण्यासाठी उत्सुक आहे. फोटोत दिसत आहे की, रणबीर आणि आलियामध्ये एक खास बाँडिंग आहे.