मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. अर्थात मलायका बऱ्याच दिवसांपासून पडद्यावर दिसलेली नाही. पण तिचं वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. करिअरपासून लग्नापर्यंत, लग्नापासून घटस्फोट आणि मग नव्या प्रेमाची सुरुवात... असं काहीसं मलायकाचं आयुष्य आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

48 वर्षांची मलायका तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली तेव्हा चांगलाच गोंधळ उडाला होता. मलायका अरोराला ट्रोलर्सपासून जजमेंटपर्यंत सहन करावं लागलं होतं, पण आता अर्जुनच्या प्रेमाने तिला फक्त आनंद दिला आहे. मलायका आता उघडपणे आपलं प्रेम व्यक्त करते. आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत त्यात तुम्हाला मलायका अरोराच्या घराची झलकही पाहता येईल.


अलीकडेच मलायका अरोराने जमिनीवर बसून लिविंग एरिआमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये ती तिच्या केसांशी खेळताना दिसत आहे. यासोबतच तिने तिच्या चाहत्यांनाही तिच्या राहत्या घराची झलकही दाखवली आहे. पण या व्हिडिओमध्ये मलायका मागे वळून बघू लागते, तेव्हा चाहत्यांना वाटतं की, अर्जुनही मागे नाही. या व्हिडिओमध्ये मलायकाच्या मागे कोण दिसत होतं हे माहीत नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून तिने तिच्या चाहत्यांना तिच्या घरची भेट नक्कीच दिली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यासोबत, मलायकाने नंतर तिच्या खोलीचा एक फोटो शेअर करत एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, MAGIC HOUR LIGHT तसंच, तिचं फोटोशूट अनेकदा लाइमलाइटचा भाग बनतो.