अमेरिका : प्रसिद्ध पॉप स्टार सेलेना गोमेजचे जगभरातील अनेक रसिक काल तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे काळजीत पडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलेना अनेक दिवस तिच्या चाहत्यांपासून नेमकी का दूर राहतेय ? तिच्या आगामी अल्बमच्या प्रमोशनमध्ये सेलेना का दिसत नाही ? या प्रश्नाचा खुद्द सेलेनाने खुलासा केला आहे. 


२०१५ साली सेलेनाला लूपस या आजाराचे निदान झाले होते. या आजाराच्या उपचाराचा एक भाग म्हणून तिच्यावर किडनी प्रत्यारोपण करावे. सेलेनाला तिची खास मैत्रिण फ्रॅन्शिआ रेसा हीने किडनी दिली आहे. सेलेनाने रेसा सोबत हातात हात पकडल्याचा एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोखाली तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. तसेच या आजारातून बाहेर पडताना डॉक्टर, तिच्या घरातील नातेवाईक आणि विशेष करून फ्रॅन्शिआ रेसा हीचे आभार मानले आहेत. 



 


रेसाने मला किडनीदान करून सगळ्यात सुंदर गिफ्ट दिले आहे. मी भाग्ववान आहे. अशा शब्दात तिचे आभार मानले आहेत.  


लुपस या आजाराबद्दल समाजात अजूनही फारशी जागृती नाही. पण काही संस्था त्यासाठी काम करत आहेत. तरूण मुलांमध्ये लूपस हा आजार बळावतो. तो एक ऑटोइम्यून आणि गंभीर आजार आहे. वृद्धांपेक्षा तरूणांमध्ये किडनी प्रत्यारोपणाने त्याचा धोका कमी करता येऊ शकतो. 


फ्रॅन्शिआ रेसा ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'द सिक्रेट लाईफ ऑफ द अमेरिकन टीनेजर' या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे.